भुसावळ (18 सप्टेंबर 2025) : शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील दिनदयाल नगरातील शाळा क्रमांक 35 मध्ये शुक्रवार, 19 रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडानिमित्त व माजी नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे आरोग्य शिबिर गोल्डन अवर रुग्णालयाच्या माध्यमातून होत आहे.

नागरिकांची होणार मोफत आरोग्य
मोफत आरोग्य शिबिरात रक्तदाब (बी.पी.), डायबीटीस (शुगर), कार्डीओग्राम (ईसीजी) अगदी मोफत काढण्यात येणार असून तज्ज्ञ डॉक्टर कॉन्सीलिंग (आरोग्यावर समुपदेशन) करणार आहेत.
धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने सर्व वयोगटातील प्रभाग क्रमांक 20 मधील सर्व नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी नगरसेवक पिंटू ठाकूर व मित्र परिवाराने केले आहे.