Meritorious students honored at K. Narkhede School in Bhusawal भुसावळ (18 सप्टेंबर 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात मंगळवार, 16 रोजी दुपारी चार वाजता शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये संपन्न झालेल्या दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून यावल महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ.संध्या सोनवणे होत्या.संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, पालक-शिक्षक संघांचे उपाध्यक्ष भागवत पाटील, मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल.राणे, पर्यवेक्षक एस.पी.पाठक. संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनी, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक-विद्यार्थी उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांचा झाला गौरव
विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय. एन.झोपे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कै.बाबासाहेब के नारखेडे आणि कै. दादासाहेब एन.के. नारखेडे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी विज्ञान शाखेतून प्रथम- ईशान भारंबे, द्वितीय- मिताली राणे, वाणिज्य शाखेतून प्रथम- पौर्णिमा चौधरी, द्वितीय- प्रेरणा चौधरी, कला शाखेतून प्रथम- दिव्या खुळपे, द्वितीय- शबनम लांगे.
माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीमधून प्रथम- आर्या नंद गवळी, द्वितीय- वृषाली चौधरी तसेच प्रत्येक विषयामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून खुश जावळे, पौर्णिमा चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.डॉ.संध्या सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे व इतर पदाधिकारी यांनी सुद्धा मुलांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.व्ही.पाटील यांनी विद्यार्थ्यांना गौरवून त्यांचे कौतुक केले.
सूत्रसंचलन व्ही.एम.महाजन यांनी तर आभार विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांनी मानले.