रॉयल एनफील्डची ‘Meteor 350’ नव्या लूकमध्ये लाँच ; फिचर्स अन् किंमत जाणून घ्या

Royal Enfield’s ‘Meteor 350’ launched in a new look जळगाव (19 सप्टेंबर 2025) : नवीन जीएसटी रचनेच्या घोषणेनंतर रॉयल एनफिल्डने रॉयल एनफिल्डने त्यांची लोकप्रिय क्रूझर Meteor 350 नव्या लूकमध्ये लाँच केली आहे.

नवीन नियमांनुसार या बाईकवर फक्त 18% जीएसटी लागू होईल. परिणामी, तिची सुरुवातीची किंमत फक्त 1,95,762 (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

ही बाईक पहिल्यांदा 2020 मध्ये लाँच झाली होती आणि तेव्हापासून जगभरात 5,00,000 हून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. यावेळी, कंपनीने तिच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांमध्ये लक्षणीय बदल केले आहेत जेणेकरून ती आणखी आकर्षक होईल. चशींशेी 350 ही चार प्रकारांमध्ये येईल. फायरबॉल, स्टेलर, ऑरोरा आणि सुपरनोव्हा.

व्हेरिएंट रंग किंमत
फायरबॉल : ऑरेंज आणि फायरबॉल ग्रे 1,95,762 रूपये
स्टेलर : मैट ग्रे आणि स्टेलर ब्लू 2,03,419 रूपये
ऑरोरा : रेट्रो ग्रीन आणि ऑरोरा रेड 2,06,290 रूपये
सुपरनोवा : ब्लॅक 2,15,883 रूपये

नवीन डिझाइनसोबत रॉयल एनफील्डने क्रूझर Meteor 350 बाईकमध्ये कंपनीने मोठे बदल केले आहेत. 349 लल क्षमतेचा सिंगल- सिलेंडर, एअर – ऑइल कूल्ड इंजिन दिले आहे. जे 20.2 लहि पॉवर आणि 27 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड टान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. इंजिन स्मूथ पॉवर डिलिव्हरी आणि दर्जेदार टॉर्कसाठी ओळखले जाते. रॉयल एनफील्डने क्रूझर ‘मीटिओर 350’ही बाईक विशेषत: टूरिस्ट रायडर्ससाठी डिझाइन केली आहे. या सर्व व्हेरिएंट्समध्ये आता स्टँडर्ड म्हणून एलईडी हेडलॅम्प, णडइ चार्जिंग पोर्ट आणि असिस्ट- अँड- स्लिप क्लच दिले आहेत. सीट एर्गोनॉमिक असल्याने रायडिंगसाठी आरामदायी ठरणार आहे.