Minor girl kidnapped from Yaval : Four arrested along with girl from Pune यावल (19 सप्टेंबर 2025) : यावल शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले होते. ही घटना एप्रिल महिन्यात घडली होती. दरम्यान पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेत तब्बल साडेचार महिन्यानंतर तिला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. मुलीला सुरक्षित तेथून आणत तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण ?
शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने 27 एप्रिल रोजी कसलेतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी 28 एप्रिल रोजी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केला व अल्पवयीन मुलीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. तब्बल साडेचार महिने या मुलीचा शोध चालला होता.
या संशयीतांना अटक
या प्रकरणी नितीन ज्ञानेश्वर सोनवणे (23), गजानन शेनपड लहाने (35), वंदना ज्ञानेश्वर सोनवणे (45, तिघे रा.माऊली नगर, सिल्लोड, ता.सिल्लोड, जि.छत्रपती संभाजी नगर) व संजय ओंकार सपकाळ (30, रा.पारद खुर्द, ता.भोकरदन, जि.जालना) या चार जणांना अटक करण्यात आली. तपास हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.