Offensive post on social media : Youth from Yaval taluka arrested यावल (19 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील परसाडे बुद्रुक येथील रहिवाशी साहिल राजू तडवी (22) या तरुणाने सोशल नेटवर्कच्या इन्स्टाग्रामवर महापुरुषांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने गावात तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. यावल पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपीविरोधात गुन्हा दाखल करूनत त्यास अटक केली. त्यास गुरुवारी न्यायालयात हजर केले असता 20 सप्टेंबरपर्यंत दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

काय घडले परसाडे गावात ?
परसाडे बुद्रुर्कें ता.यावल येथील रहिवाशी साहिल राजू तडवी (22) या तरुणाने सोशल नेटवर्कच्या इन्स्टाग्रामवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने ती व्हायरल झाली व एका धर्माच्या धार्मिक भावना प्रचंड दुखावल्या गेल्या. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलिसात कमलेश शिर्के यांच्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्याला तत्काळ अटक केली.
गुरुवारी संशयीताला यावल येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्यायधिश आर.एस.जगताप यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता 20 सप्टेंबरपर्यंत दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहे.
सोशल मिडीया वापरताना सावधान ! पोलिस निरीक्षकांचा इशारा
सोशल नेटवर्कचा तरुणांनी योग्य वापर करावा. धार्मिक भावना दुखावली जाणार अशी कुठल्याचं प्रकारची पोस्ट तसेच वैयक्तिक सार्वजनिक स्वरूपाच्या वादग्रस्त पोस्ट कोणी करू नये. यावल तालुक्यातील सोशल नेटवर्कच्या विविध ग्रुपवर पोलिसांची करडी नजर असून सोशल नेटवर्क वर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्यांची गय केली जाणार नाही, असे यावल निरीक्षक रंगनाथ धारबळे म्हणाले.