Five lakhs worth of electric wires were extended : Case in Jalgaon taluka जळगाव (19 सप्टेंबर 2025) : जळगाव तालुक्यातील जळके ते वावडदा रोडवरील महावितरण कंपनीच्या मालकीचे पाच लाख रुपये किंमतीचे 18 इलेक्ट्रिक पोलवरील पाच हजार 200 मीटर लांबीचे अॅल्युमिनियम तार (कंडक्टर) चोरी झाल्याचा प्रकार 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता समोर आला. याप्रकरणी गुरूवार, 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे चोरी प्रकरण ?
जळगाव तालुक्यातील जळके गावापासून वावळदा गावाकडे जाणार्या रोडवर सुधाकर येवले यांच्या शेतापासून ते गुप्ता यांच्या रिसॉर्टपर्यंत असलेल्या 18 इलेक्ट्रिक पोलवरील 33 के.व्ही.ची अॅल्युमिनियम तार चोरीला गेली. या तारेची लांबी सुमारे पाच हजार 200 मीटर असून, त्याची किंमत अंदाजे पाच लाख रुपये आहे.
अज्ञात चोरट्यांनी हा मुद्देमाल चोरून नेला आहे. सार्वजनिक ठिकाणी, विजेच्या खांबावरून इतक्या मोठ्या प्रमाणात तार चोरीला गेल्याने पोलिसांपुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. याप्रकरणी वीज कंपनीसाठी काम करणारे कंत्राटदार, 32 वर्षीय अनिस नसिम अहमद यांनी या घटनेची फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुरूवारी 18 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजता एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार किरण पाटील करीत आहेत.