सोन्याच्या भावाला पुन्हा झळाळी

Gold prices rise again जळगाव (19 सप्टेंबर 2025) : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर, आज, 19 सप्टेंबर 2025 रोजी सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 421 रुपयांनी वाढून एक लाख नऊ हजार 473 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे तर चांदी 1,644 रुपयांनी म्हणजेच 1.3 टक्क्यांनी वाढून एक लाख 28 हजार 755 रुपये प्रति किलो झाली आहे. चांदीने एक लाख 30 हजार 284 रुपये प्रति किलोचा सर्वोच्च उच्चांक गाठला.

जळगाव सुवर्णपेठेत 22 कॅरेट सोने प्रति तोळा 1,00,940 रुपये, तर 24 कॅरेट सोने प्रति तोळा 1,10,200 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी प्रति किलोवर 1,29,500 रुपयावनर पोहोचली आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि जयपूरमध्ये 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅमवर 1,11,480 रुपयांवर आहे, तर 22 कॅरेट सोने 1,02,200 रुपयांवर आहे.

त्याचप्रमाणे, अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोने 1,11,330 रुपयांना आहे, तर 22 कॅरेट सोने 1,02,500 रुपयांवर आहे.