परप्रांतीय गुन्हेगार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Jalgaon Crime Branch takes major action in Bhusawal: Accused of forced theft arrested भुसावळ (19 सप्टेंबर 2025) : जळगावगुन्हे शाखेने जबरी चोरीसह गंभीर गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या आरोपीला भुसावळातील नाहाटा चौफुलीवर बेड्या ठोकल्या. साहिल उर्फ सलीम पठाण (21, रा.भाटीया गाव, हाजीपुरा, सचिन, जि.सुरत) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

भुसावळात ठोकल्या बेड्या
आरोपी साहिल पठाण हा भुसावळातील नाहाटा चौफुलीवर आल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली.

आठ गंभीर गुन्हे
आरोपीवर यापूर्वी आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात गुजरातच्या उमरा ठाण्यात तीन, गुजरातच्या सचिन, माहिरपूरा, पुना, कडोदरा व नवसारी ग्रामीण ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.
आरोपीला निझर पोलीस स्टेशन, सुरत येथील एएसआय ए.बी.पटेल यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.प

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, रवी नरवाडे, हवालदार गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी व राहुल वानखेडे आदींनी केली.