भाच्याने डोक्यात मारली सांडशी ! अमळनेरात महिला गंभीर जखमी

Mobile game addiction: Brother-in-law hit on the head with a hammer for not paying अमळनेर (20 सप्टेंबर 2025) : मोबाईल वापरण्याचा अतिरेक किती धोकादायक असतो याबाबतच्या घटना सभोवताली पाहूनच अंगावर शहारा येतो. त्यातच अमळनेरात मात्र मोबाईलवरील मोफत खेळासाठी आत्याने पैसे न दिल्याने संतापी भाच्याने डोक्यात सांडशी मारून महिलेला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवार, 17 रोजी सकाळी 11 वाजता घडली. अमळनेर पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली. मारहाणीत हलीमा बी.अब्दुल रशीद (50, रा.ख्वाजा नगर, रेल्वे टाकी फाईल, अमळनेर) या जखमी झाल्या.

काय घडले अमळनेर शहरात ?
घरी असताना हलीमाबी यांचा भाचा सकलैन मोहिद्दीन पिंजारी याने तिच्याकडे, मला पैसे लागणार आहेत, पैसे दे, नाहीतर तुला आजोबांच्या घरात राहू देणार नाही, अशी धमकी दिली. माझ्याकडे पैसे नाही, असे हलीमा बी.यांनी सांगताच सकलैन याने संतापून सांडशीने तिच्या डोक्यात मारले आणि तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. हालीमा बी.यांच्या वडिलांनी भांडण सोडवून तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. महिलेला अधिक उपचारासाठी धुळ्याला हलवण्यात आले व उपचार घेऊन आल्यानंतर अमळनेर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या तरुणाने मोबाईलमधील फ्री फायर गेमसाठी पैसे मागत असल्याची कबुली दिली. गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.