सोने झाले महाग ; जळगावातील दर पाहिले का ?

Gold has become expensive; have you seen the prices in Jalgaon? जळगाव (20 सप्टेंबर 2025) : सोन्यावर ग्राहकांनी दाखवलेला विश्वास व जागतिक घडामोडीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जळगावातील भंगाळे गोल्ड प्रतिष्ठानच्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदी दरात तीन हजारांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

शनिवारच्या दरानुसार, 22 कॅरेट सोनं प्रति तोळा एक लाख एक हजार 670, तर 24 कॅरेट सोनं प्रति तोळा एक लाख 11 हजार इतके झाले आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो एक किलो 32 हजार 500 वर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत तीनह जारांची थेट वाढ झाली आहे.

सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून स्थिरावले होते परंतु आज पुन्हा वाढ झाली आहे. दुसरीकडे, चांदीत आलेली झपाट्याची उसळी गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे. दररोजच्या बदलत्या दरामुळे बाजारात खरेदी-विक्रीची चळवळ वाढत असून, ग्राहक सोनं-चांदी खरेदीसाठी अधिक उत्सुकतेने सराफ पेढ्यांकडे वळत आहेत.