जळगावातील उद्योजकाला 2.55 कोटींचा गंडा

Jalgaon businessman cheated of Rs 2.55 crores जळगाव (20 सप्टेंबर 2025) : शेअर बाजार हा जोखमीचा व धोक्याचा व्यवहार असतानाही नागरिक सातत्याने आमिषाने भुलून आपली फसवणूक करून घेत असल्याच्या घटना समारे येत आहेत. जळगावातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. पॅकेजिंग उद्योगाच्या मालकाला एका लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर अवघ्या एका दिवसात 50 हजार रुपयांचा नफा दाखवण्यात आला व विश्वास बसवता भामट्यांनी तब्बल 2.55 कोटी रुपये उकळले. ही घटना उघड झाल्यानंतर जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले जळगावात शहरात ?
मिळालेल्या माहितीनुसार, मुर्तुजा खानभाई लोखंडवाला (42, रा.तारा बिझनेस पार्क, कुसुंबा, जळगाव) यांना व्हॉट्सअ‍ॅपवरून ‘क्रिस्टन’ नावाच्या व्यक्तीकडून संपर्क झाला. त्याने ‘आरयूएसएल-सी सीएम’ नावाच्या कथित शेअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. 21 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत तीन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून (9779648236, 7741319336 आणि 7749898937) त्यांना 2 कोटी 55 लाख 50 हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. बदल्यात 15 कोटी रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले, पण रक्कम काढण्यासाठी आणखी पैसे मागितले.

तीन बँकांद्वारे 13 व्यवहार
लोखंडवाला यांनी या कालावधीत 50 हजार, 1 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख आणि 40 लाख अशा रकमांचे 13 व्यवहार केले. हे पैसे ‘आरयूएसएल-सी सीएम’ अ‍ॅप आणि हीींिं://ार्.ीीीीशश्रश्रला.पशीं/ या लिंकद्वारे अ‍ॅक्सिस बँक, बंधन बँक आणि आयसीआयसीआय बँकांद्वारे भरले गेले.

विश्वास बसवण्यासाठी पहिला नफा परत
फसवणूककर्त्यांनी सुरुवातीला विश्वास जिंकण्यासाठी 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 49,500 रुपयांचा नफा दाखवला आणि तो काढूही दिला. यामुळे उद्योजक यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली. वेळोवेळी मिळालेल्या रकमेवर नफा ऍपमध्ये दाखवण्यात येत होता.

एक कोटी गुंतवले तरी काढता येत नाही रक्कम
लोखंडवाला यांनी ,व कोटी रुपये गुंतवल्यानंतर रक्कम काढण्यासाठी साडेतीन कोटी भरावे लागतील, असे सांगण्यात आले. नंतर आणखी गुंतवणुकीचे आमिष दाखवून रक्कम 2.5 कोटींवर नेली. 15 कोटी नफा दाखवला, पण काढण्यासाठी पुन्हा पैसे मागितले तेव्हा फसवणूक उघड झाली.

लोभाला बळी न पडण्याचे आवाहन
या प्रकारच्या घोटाळेबाज सेबी-नोंदणीकृत कंपन्यांच्या नावाशी साम्य असलेली बनावट नावे वापरतात आणि वारंवार बदलतात. नागरिकांनी अशा लोभाला बळी न पडता गुंतवणुकीपूर्वी तपासणी करावी, असे जळगाव सायबर विभागाचे प्रमुख निरीक्षक सतीश गोराडे यांनी आवाहन केले आहे.