उद्योग क्षेत्राला बुस्टर ; 40 हजारांवर रोजगार : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 9 कंपन्यांशी करार

मराठवाड्यासह विदर्भ, कोकणात तब्बल 80 हजार 962 कोटी रुपयांची गुंतवणूक

Over 40,000 jobs created in the state : Agreements signed with nine companies in the presence of the Chief Minister मुंबई (20 सप्टेंबर 2025) : राज्यात लवकरच 40 हजारहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. त्याला कारण एआयआयएफए (आयफा) तर्फे येथे आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात राज्य सरकारच्या उद्योग विभागाने 9 कंपन्यांशी केलेला सामंजस्य करार ! तब्बल 80 हजार 962 कोटी रुपयांचा सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आला आहे.

या जिल्ह्यात उभारणार प्रकल्प
गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सातारा आदी जिल्ह्यांत हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. या गुंतवणुकीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील औद्योगिक विकासाला गती मिळेल तसेच स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल.

उद्योगांसाठीची वीज दरवर्षी स्वस्त होणार !
महाराष्ट्रात 2030 पर्यंत 58 टक्के वीज अक्षय ऊर्जेतून येणार आहे. 2026 पर्यंत शेतकर्‍यांना दिली जाणारी 16 हजार मेगावॅट वीज सौर ऊर्जेद्वारे मिळेल त्यामुळे सबसिडी कमी होऊन उद्योगांसाठी वीज दर पुढील पाच वर्षे दरवर्षी कमी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
आयफा स्टीलेक्स 2025 या स्टील महाकुंभाचे उद्घाटन फडणवीस यांच्याहस्ते झाले. यावेळी केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन, यूएनडीपी इंडिया प्रमुख डॉ. अँजेला लुसी, आयफाचे अध्यक्ष योगेश मंधाणी, मानद सरचिटणीस कमल अग्रवाल उपस्थित होते.