हिवरा नदीत नात वाहताच आजोबांचाही मृत्यू : वडगाव टेक गावात शोककळा

Grandfather lost his life due to shock of granddaughter’s death : Incident in Pachora taluka पाचोरा (20 सप्टेंबर 2025) : हिवरा नदीत पाय घसरून पडल्याने नात वाहून गेल्याची माहिती मिळताच तिचे पालनकर्ता असलेल्या आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अंगावर शहारे आणणारी ही घटना वडगाव टेक (ता.पाचोरा) येथे शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. नीता संजय भालेराव (14) असे या वाहून गेलेल्या नातीचे शामराव विठ्ठल खरे (72) असे मृत आजोबांचे नाव आहे.

काय घडले चिमुकलीसोबत ?
नीता भालेराव हील मामीसोबत शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास हिवरा नदीवर धुणे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाय घसरल्यामुळे नीता नदीच्या प्रवाहात वाहून गेली. तिला वाचविण्यासाठी मामीसुद्धा नदीत उतरली मात्र गावकर्‍यांनी उड्या मारून मामीचे प्राण वाचवले. ही दुर्दैवी घटना कळताच नीताचे आजोबा शामराव खरे यांना धक्का बसला आणि काही वेळातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

आधी हरवले पित्रृ छत्र
दरम्यान, निता ही चार वर्षांची असताना वडिलांचा मृत्यू झाला होता त आई मजुरीसाठी दुसर्‍या शहरात वास्तव्याला आहे. आईचे वडील शामराव खरे यांच्याकडे नीता आणि तिची बहिण राहत होते. आता नीताही वाहून गेल्यानंतर घराचा आधार असलेले आजोबा नसल्याने या कुटूंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.