Bhusawal MLAs are strong : State government approves Rs 1 crore each for Bhusawal and Varangaon for Namo Udyona भुसावळ (20 सप्टेंबर 2025) : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत भुसावळसह वरणगाव पालिकेला प्रत्येकी एक कोटींचा भरीव निधी मंजूर केला आहे. या निधीतून दोन्ही शहरांमध्ये भव्य नमो उद्यान उभारण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार, 17 सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने हा शासन निर्णय प्रकाशित केला आहे. ही मोदिजींच्या वाढदिवसाची भुसावळ शहरवासीयांना विकासात्मक भेट असल्याची माहिती भुसावळ मतदारसंघाचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली. आहे.
नागरिकांना मिळणार अधिकाधिक सुविधा
नमो उद्यान या महत्त्वापूर्ण प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल मंत्री संजय सावकारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व राज्य सरकारचे आभार मानले आहेत. या उद्यानांच्या माध्यमातून आबालवृद्धांसह नागरिकांना अधिक सुविधा मिळतील, असेही मंत्री सावकारे म्हणाले.
नमो उद्यानामुळे भुसावळकरांना मिळणार या सुविधा
नागरिकांना आधुनिक, हिरवाईने नटलेले आणि सुसज्ज उद्यानाची सुविधा मिळणार आहे.
मुलांसाठी खेळाची साधने, नागरिकांसाठी व्यायामाचे साहित्य, वॉकिंग ट्रॅक व विश्रांतीची सोय उपलब्ध होणार आहे.
पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळून, शहरातील जीवनमान अधिक आरोग्यदायी व समृद्ध होणार आहे.
शहर सौंदर्यीकरणाबरोबरच सामाजिक एकात्मता व नागरीकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडणार आहे.