लासलगाव हादरले : एकतर्फी प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाची हत्या : तिघांना अटक

Relatives of the girl killed the minor with a crowbar over a one-sided love affair लासलगाव (22 सप्टेंबर 2025) :  अल्पवयीन मुलीशी असलेल्या एकतर्फी प्रेम प्रकरणानंतर संतप्त नातेवाईकांनी अल्पवयीनाची कोयत्याचे वार करीत हत्या केली. नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये ही घटना घडली. एकतर्फी प्रेमप्रकरणातून हे घडल्याचेही सांगण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये एका अल्पवयीन मुलाची मुलीच्या नातेवाईकांनीच हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाची हत्या एकतर्फी प्रेमातून करण्यात आली. लासलगाव रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली.

मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींनी मुलावर कोयत्याने रेल्वे परिसरात हत्या केली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुलाची हत्या करण्यात आल्यानंतर मुलाचे नातेवाईक आक्रमक झाले. संतप्त नातेवाईकांनी पोलिस अधिकार्‍यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली.

मुलाच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन जणांना अटकही केली.