Newborn dead baby found in Chunchale : Crime against unknown यावल (22 सप्टेंबर 2025) : नवजात मृत अर्भकाला फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील चुंचाळे गावातून समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून हे अर्भक जन्मल्याचा संशय आहे.

काय घडले चुंचाळे गावात ?
रविवार, 21 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चुंचाळे येथील विलास भावलाल पाटील हे आपल्या शेतात जात असताना, त्यांच्या घराशेजारी मोकळ्या जागेत काही कुत्रे जमिनीवर पडलेली एक वस्तू चाटताना दिसले. पाटील यांनी कुत्र्यांना हाकलून दिले आणि जवळ जाऊन पाहिले असता त्यांना एक दिवसाचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले.
विलास पाटील यांनी तत्काळ गावात चौकशी केली, परंतु याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी यावल पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.