Married woman molested on rooftop in the middle of the night: Husband also threatened जळगाव (22 सप्टेंबर 2025) : जळगाव तालुक्यातील एका गावात विवाहिता कुटुंबासह गच्चीवर झोपलेली असतांना गावात राहणार्या एकाने रविवार, 21 सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजता अश्लिल वर्तन करत विनयभंग केला. महिलेच्या पतीला व महिलेला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले विवाहितेसोबत ?
जळगाव तालुक्यातील एका गावातील एका भागात 24 वर्षीय महिला ही आपल्या पती व कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. रविवार, 21 सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास महिला ही पती व कुटुंबासह घराच्या गच्चीवर झोपलेली असतांना संशयित आरोपी महेंद्र पांडूरंग मराठे हा गच्चीवर येवून महिलेशी अश्लिल वर्तन केले. हा प्रकार घडताच महिलेने तिच्या पतीला उठविले. त्यावेळी संशयित आरोपी महेंद्र मराठे याने महिलेसह तिच्या पतीला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर महिलेने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार धनराज साळुंखे करीत आहे.