A youth from Sakegaon drowned in the Waghur river and died भुसावळ (22 सप्टेंबर 2025) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारात वाघूर नदीत पाण्यात पाय घसरून पडल्याने साकेगावातील 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. लक्ष्मण वसंत ठाकरे (32, रा.श्रीराम चौक, सिंगार बर्डी, साकेगाव, ता. भुसावळ) असे मृताचे नाव आहे.

काय घडले तरुणासोबत ?
शनिवार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण ठाकरे हे म्हशी चारण्यासाठी वाघुर नदीपात्राजवळ गेला व जुन्या हायवे पुलावरून जात असताना त्याचा पाय घसरला व तो नदीत पडला, पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून जावून त्याचा मृत्यू झाला.
भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मृताच्या नातेवाईक सागर सुधाकर भील (रा.श्रीराम चौक, सिंगार बर्डी, साकेगाव) यांनी तालुका पोलिस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृ्त्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक चौकशी पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मिक सोनवणे करीत आहेत. ट्रामा सेंटरमध्ये पंचनामा करण्यात आला.