Manoj Jarange’s advice: Dhananjay Munde should go for employment guarantee work! जालना (22 सप्टेंबर 2025) : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या पक्षाच्या नेतृत्वाकडे हाताला काम मागितल्यानंतर यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना रोजगार हमीच्या कामाला जाण्याचा सल्ला दिल्याने या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणी दोन दिवसांत खुमासदार प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिलेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंसारखा माणूस कोणत्याही पदावर पुन्हा परत येऊ नये, असे निक्षुण सांगितले आहे.
काय म्हणाले मुंडे ?
धनंजय मुंडे यांनी रायगड येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे एखादी जबाबदारी मागितली होती. सुनील तटकरेंनी मला वडिलांसारखा आधार दिला किंबहुना त्यांच्यामुळेच मी आज येथे उभा आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला कायम मार्गदर्शन करत रहावे. चुकले तर कानही धरावा पण आता रिकामे ठेवू नये. आम्हाला काहीतरी काम द्यावे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या विनंतीचा योग्य तो मान राखण्याचे संकेत दिलेत त्यामुळे धनंजय मुंडे लवकरच एखाद्या नव्या पदावर दिसतीर्लें अशी शक्यता र्ींज्ञसीफ
बराशी खोदायला रोहयोच्या कामाला जा : जरांगे पाटील
पत्रकारांनी याविषयी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना छेडले असता त्यांनी धनंजय मुंडे यांना थेट रोजगार हमीच्या कामावर बराशी खोदण्यास जाण्याचा उपरोधिक सल्ला दिला. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांना रोजगार हमीच्या कामावर बराशी खोदण्यासाठी जा म्हणावे. तो माझा प्रश्न नाही. तो त्यांचा वैयक्तिक राजकीय प्रश्न आहे. पण त्यांच्यामुळे मराठ्यांना त्रास झाला तर अजित पवारांचा कार्यक्रम होईल. इथे मराठ्यांना त्रास झाला तर अजितदादांचा खेळ संपला, असे समजावे.
छगन भुजबळांवरही साधला निशाणा
जरांगे पाटलांनी यावेळी धनंजय मुंडेंना ओबीसीचे काम करण्याचा सल्ला देणार्या मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, तो तसेच लोक कामाला लावतो. मग त्याला खेळण्यास रान मोकळे राहते. तो फुकटात जातींचा वापर करून घेतो. तू गरीब जातींचा फुकटात वापर करून घेतो. त्याला भारी गेम जमतो.
भुजबळ हे ओबीसीला लागलेला सर्वात मोठा डाग आहे. सगळ्या ओबीसी व मराठ्यांचे त्याने वाटोळे केले. त्यांना पापाची परतफेड करावीच लागेल. न्यायदेवता त्याच्यासाठी नाही, सर्वांसाठी आहे. जनता नाही, जनार्दन नाही, तुकाराम नाही किंवा एकनाथही नाही. त्यांच्या डोक्यावर पापाचा हात आहे. त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. त्यांना अजून खूप भोगावे लागेल.
सुरेश धस दोन दिवसांत खुमासदार उत्तर देणार
दुसरीकडे, भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या मु्द्यावर दोन दिवसांत खुमासदार प्रतिक्रिया देण्याचे सूतोवाच केले आहे. धनंजय मुंडेंना काम हवे आहे, पण मी आज यावर बोलणार नाही. माझ्या मतदारसंघात मोठा पूर आला आहे. खरडून गेलेल्या जमिनीसंदर्भात मी इथे आलो आहे. पण दोन दिवसांत मी या संदर्भात खुमासदार उत्तर देईल, असे ते म्हणाले.
हा व्यक्ती कोणत्याही पदावर पुन्हा येऊ नये : अंजली दमानिया
दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंसारख्या व्यक्तीला सर्वच पदांपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. धनंजय मुंडे यांना जनतेच्या कामापासून दूर ठेवावे, असे माझे स्पष्ट मत आहे. त्यांचा आता वेळ जात नाही. त्यामुळे त्यांनी सुनील तटकरेंना काहीतरी काम देण्याचे साकडे घातले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षबांधणी सारखी कामे करावीत. पण जनतेच्या कोणत्याही पदांवर हा व्यक्ती परत येणार नाही याची काळजी त्यांच्या पक्षाने घेतली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.