Violent incident against a 38-year-old active woman in Bhusawal : Accused’s house vandalized; Police arrest accused भुसावळ (23 सप्टेंबर 2025) : शहरातील एका भागातील 38 वर्षीय गतिमंद महिलेवर जवळच राहणार्या संशयीताने अतिप्रसंग केल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी दुपारी 1.15 वाजता घडला. या प्रकारानंतर संतप्त रहिवाशांनी आरोपीच्या घरात तोडफोड केली. आरोपीवर कारवाई करण्यासाठी मोठ्या संख्येने महिलावर्ग शहर पोलिस ठाण्याबाहेर जमला होता तर रात्री उशिरा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले महिलसोबत ?
शहर पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे म्हणाले की, भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात मंगळवार, 23 रोजी दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास 38 वर्षीय गतिमंद महिलेच्या घरात संशयीत इम्रान पिंजारी याने शिरून महिलेवर अतिप्रसंग केला. हा प्रकार महिलेच्या नातेवाईकांनी पाहिल्यावर आरडा-ओरड झाल्यानंतर संशयीत पसार झाला तर संतप्त जमावाने आरोपी पिंजारीच्या घराची तोडफोड केली.
संशयीताविरोधात गुन्हा : आरोपीला अटक
या प्रकरणातील संशयीत पिंजारीविरूध्द शहर पोलिस ठाण्यात यापूर्वीही चोरीचे दोन गुन्हे दाखल आहे तर अतिप्रसंग प्रकरणी त्याच्याविरोधात रात्री उशिरा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. पीडीतेला वैद्यकीय तपासणीसाठी हलवण्यात आले आहे.