मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या वकिलाचा मोबाईल चोरट्याने केला लंपास

चाळीसगाव (प्रतिनिधी) : मंदिरात द7र्शनासाठी गेलेल्या वकिलाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने दुचाकीला लावलेल्या पिशवीतून लंपास केल्याची घटना सोमवारी (दि. २ जून) सकाळी साडेनऊच्या सुमारास हनुमानवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात घडली.
समीर रमेश तक्ते (रा. नारायणवाडी, चाळीसगाव) असे मोबाईल चोरीस गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पेशाने वकील असून, सकाळी आपल्या दुचाकीने हनुमानवाडीतील हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शनासाठी उतरताना त्यांनी दुचाकीला लावलेल्या कापडी पिशवीत आपला मोबाईल ठेवला होता.
मात्र, दर्शन घेऊन परत येईपर्यंत अज्ञात चोरट्याने संधी साधून पिशवीतून ९,६९९ रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठले.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार योगेश बेलदार करत आहेत.