कापड दुकानात काम करणार्‍या महिलेवर अत्याचार : तरुणाला बेड्या

Torture of a married woman in Dharangaon taluka: Accused youth arrested धरणगाव (24 सप्टेंबर 2025) : धरणगाव तालुक्यातील एका गावातील एका कापड दुकानात कामास असलेल्या विवाहितेवर तेथे कामाला असलेल्या तरुणाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल होताच संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

असे आहे प्रकरण
एका गावातील कापड दुकानात एक विवाहिता व तरुण कामाला होते. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले मात्र विवाहितेला दोन मुले व पती असल्याननंतर दोघांचे सूत जमल्यानंतर मी तुझ्या दोन्ही मुलांचा सांभाळ, करेल असे सांगून त्या तरुणाने 2021 पासून वेळोवेळी तसेच 2 सप्टेंबर रोजी तिच्या राहत्या घरी व दुकानातील दुसर्‍या मजल्यावर अत्याचार केला. ही घटना तिच्या पतीला समजल्याने त्याने महिलेला सोडून दिले.

फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर विवाहितेने तक्रार दिल्यावरून विजय गोपाल भोई (22) विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. आरोपीला मंगळवारी धरणगाव न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे करीत आहेत.