सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत जळगावातील मनपा शाळा क्र. 35 मधये छत्रपती शिवाजी महाराज चित्रकला व निबंध स्पर्धा

जळगाव (25 सप्टेंबर 2025) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त देशभर सेवा पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे मनपा शाळा क्र. 35 येथे छत्रपती शिवाजी महाराज 2025 चित्रकला व निबंध स्पर्धा उत्साहात पार पडली.

या उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) तसेच जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेसाठी चित्रकलेचा विषय स्वच्छता व पर्यावरण तर निबंध स्पर्धेचा विषय प्लास्टिक मुक्ती आणि एक पेड माँ के नाम ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंडळ अध्यक्ष श्री. अतुल भाऊ बारी, माजी नगरसेवक श्री. सुरेश भाऊ सोनवणे, श्री. विजुभाऊ पाटील, श्री. चंद्रशेखर पाटील, श्री. आशिष भाऊ सपकाळे, श्री. राहुल भाऊ पाटील, श्री. सागर जिजाबराव पाटील, शक्तीभाऊ महाजन, रवी पाटील, तसेच सौ. शोभाताई कुलकर्णी, सौ. नीतूताई परदेसी, सौ. ज्योतीताई पालीवाल, सौ. माधुरीताई हांडे (देशमुख), मंदाताई सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या उपक्रमाचे संयोजन   शिरीष तायडे यांनी केले.