A young carpenter died after falling from the third floor : Mourning in Varkhedi पाचोरा (26 सप्टेंबर 2025) : राहत्या घराच्या तिसर्या मजल्यावर सुतारकाम करत असताना अचानक पाय घसरल्याने धनराज सुभाष सुतार (35) हा युवक खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पाचोरा तालुक्यातील वरखेडी गावात शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025 रोजी ही दुर्दैवी घटना घडली.

वरखेडी गावात शोककळा
धनराज सुतार हा वरखेडी परिसरातील एक नावाजलेला सुतार कारागीर होता. आपल्या कुशल कामामुळे त्यांची पंचक्रोशीत ओळख होती. शुक्रवारी घराच्या तिसर्या मजल्यावर काही दुरुस्तीसाठी सुतारकाम करीत असताना दुपारी सुमारे एकच्या सुमारास अचानक पाय घसरल्याने तो थेट जमिनीवर पडला. डोक्याला जबर इजा झाल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शेजार्यांनी आणि कुटुंबीयांनी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला.
या घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. धनराज सुतार याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन अल्पवयीन मुली आणि दोन थोरले भाऊ असा मोठा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.