पोलिस निरीक्षकासह उपनिरीक्षक मुंबई एसीबीच्या जाळ्यात

Two lakhs bribe : Wadala TT Police Station Inspector Chandrakant Saronde and other constables caught in ACB net मुंबई (26 सप्टेंबर 2025) : तक्रारदाराच्या मुलीला एका गुन्ह्यात आरोपी न करण्यासह समोरील व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी तडजोडीअंती पहिल्या हप्त्यापोटी दोन लाखांची लाच स्वीकारताना वडाळा टीटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत सुधाकर सरोदे (52) व पोलिस उपनिरीक्षक राहुल रमेश वाघमोडे (37) यांना मुंबई एसीबीने अटक केल्याने पोलिस वर्तुळातील लाचखोर प्रचंड हादरले आहेत.

असे आहे लाच प्रकरण
लाच प्रकरणातील तक्रारदाराचे एका व्यक्ती बरोबर त्यांचे समाजाचे हॉल संबंधाने वाद आहेत. 7 सप्टेंबर रोजी तक्रारदार व त्यांच्याविरोधातील पार्टीत पुन्हा वाद झाले व दोन्ही गटाचे लोक वडाळा टीटी पोलिस ठाण्यात जमा झाले. यावेळी तक्रारदाराविरोधात समोरील गटाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या मुलीस आरोपी न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी व तक्रारदाराविरोधात असलेल्या गटातील व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक राहुल रमेश वाघमोडे यांनी स्वतःसाठी 50 हजार व वरिष्ठ निरीक्षक सरोदे यांच्यासाठी पाच लाखांची मागणी केली. 10 सप्टेंबर रोजी स्वतःसाठी 20 हजार रुपये स्वीकारले.

तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी बृहमुंबई एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. उपनिरीक्षक वाघमोडे यांना 30 हजारांची लाच घेताना पकडण्यात आले तर वरिष्ठ निरीक्षक सरोदे यांनी पाच लाखांच्या लाचेत तडजोड करीत चार लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य करीत पहिल्या टप्प्यात दोन लाख रुपये स्वीकारल्याने त्यांना एसीबीने रंगेहाथ अटक केली.

यांनी केला सापळा
अपर पोलिस आयुक्त संदीप दिवाण, अपर पोलिस उपायुक्त अनिल घेरडीकर, अपर पोलिस उपायुक्त राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कृष्णा मेखले, पोलिस नितीन थोरात आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.