डंपरने दाम्पत्यासह चिमुकल्याला चिरडले : आरोपी डंपर चालकाविरोधात गुन्हा

Three killed in Muktainagar accident ; Case filed against dumper driver from Madhya Pradesh मुक्ताईनगर (247 सप्टेंबर 2025) : सुसाट वेगातील डंपरने दुचाकीवरून जाणार्‍या कुटूंबाला जबर धडक दिल्याने दाम्पत्यासह त्यांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची तर दाम्पत्याचा चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना अपघात मुक्ताईनगरमधील पूर्णाड फाट्यावर शुक्रवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरची कॅबीन पेटवत काचाही फोडल्या होत्या. अपघात प्रकरणी मध्यप्रदेशातील डंपर चालकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

तिघांचा जागीच झाला होता मृत्यू
इंदौर-हैदराबाद या महामार्गाचे काम सुरू असून हे काम भुसावळातील बी.एन.अग्रवाल यांच्या कंपनीमार्फत सुरू आहे. या कंपनीचा मुरूमाने भरलेला डंपर (क्रमांक एम.एच.19 सी.एक्स.2038) ने समोरून
नवरात्रोत्सवात इच्छापूर येथील इच्छा देवीचे दर्शन घेवून मध्य प्रदेशातील मूळगाव मातापूर येथे जाणार्‍या भाविकांच्या दुचाकी (एम.पी.48 एम.एल.2695) ला धडक दिल्याने दुचाकीस्वार नितेश जगतसिंग चौहान (34), त्यांची पत्नी सुनीता नितेश चौहान (30) या दाम्पत्यासह त्यांचा मुलगा सुखविंदर नितेश चौहान (8, सर्व रा.मातापूर, ता.खकनार, जि.बर्‍हाणपूर, ह.मु.सिव्हील हॉस्पीटलमागे, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला होता तर दाम्पत्याचा मुलगा नेहाल नितेश चौहान (10) हा गंभीर जखमी झाला होता.

अपघातात तिघांचे बळी गेल्या प्रकरणी होमगार्ड विजय प्रल्हाद गवळी (27, पिंप्री अकराऊत) यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक महेंद्र प्रसाद पटेल (महुआबांध, ता.सिहावल, मध्यप्रदेश) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक चाटे करीत आहेत.