A young man from Dahigaon died after revealing a love affair: Minor girl taken into custody यावल (27 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील दहिगाव येथील 21 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी सखोल तपास करतांना यावल पोलिसांनी गावातील एका 16 वर्षीय अल्पवयीन विधी संघर्षित बालिकेस ताब्यात घेतले आहे. प्रेम प्रकरण उघडकीस आणले व तिच्या पालकांना माहिती दिल्याच्या रागातनू तरुणीने तरुणांना हत्या करण्याकरीता चिथावणी दिल्याचे समोर आले आहे. या बालिकेस विशेष बाल न्याय मंडळापुढे हजर केले असता तिला बाल अधिरक्षा कक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यात तीन तरुण सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
दहिगाव, ता.यावल या गावातील सुरेश आबा नगरातील रहिवासी इम्रान युनूस पटेल (21, मूळ रहिवासी हनुमंतखेडा, ता.धरणगाव) या तरुणाची 29 ऑगस्ट रोजी रात्री ज्ञानेश्वर गजानन पाटील (19) व गजानन रवींद्र कोळी (19, दोन्ही रा.सुरेश आबा नगर, दहिगाव) या तरुणांनी कोयत्याने वार करीत हत्या केली होती व ते दोघे पोेलिसांंना शरण आले होते.
या गुन्ह्यात त्यांच्या सोबत यावल शहरातील सुतार वाडा भागातील रहिवासी तुषार राजेश लोखंडे उर्फ जन्नत (19) हा देखील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्यात नागपूर येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीकडे देखील पोलिसांना सखोल तपास केला होत. व सखोल तपास अंती दहिगावातील 16 वर्षीय अल्पवयीन विधी संघर्षीत बालिकेसंदर्भात अनेक पुरावे पोलिसांना मिळाल्याने तिला ताब्यात घेण्यात आले.
तपास यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहे.