प्रवाशांना मोठी सुविधा : जळगाव आगारातील 13 ई बसेसचे लोकार्पण

13 E-buses join Jalgaon Corporation’s fleet : Will run on ‘this’ route! जळगाव (29 सप्टेंबर 2025) : जळगाव आगारासाठी 70 ई-बसेस मंजूर झाल्या असून पहिल्या टप्यात प्राप्त 13 बसेसचे लोकार्पण शनिवारी विभागीय कार्यशाळा येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

पाच वातानुकूलित बसचा समावेश
या 13 बसेसमध्ये 12 मीटर लांबीच्या आठ व नऊ मीटर लांबीच्या पाच वातानुकूलित बसेसचा समावेश आहे. नऊ मीटरच्या बसचे भाडे प्रतिटप्पा 13.80 रुपये तर 12 मीटर बसचे प्रवास भाडे प्रतिटप्पा 15.15 रुपये आहे. या बसेस चाळीसगाव, जामनेर, शिरपूर, चोपडा, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि नाशिक या मार्गावर धावणार आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ई-बसची चार्जिंग प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून दिली. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय अधिकारी यांनी विभागीय कार्यशाळेपासून विमानतळापर्यंत बसने प्रवास करून प्रत्यक्ष चाचणी घेतली. प्रास्ताविक विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी केले. सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक संदीप सूर्यवंशी यांनी केले.