Sale of village pistol in Yaval city: Suspect from Amalner arrested यावल (29 सप्टेंबर 2025) : अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर दहिगाव फाट्याजवळ गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काढतूस खरेदी-विक्री करतांना दोघांना बुधवारी मध्यरात्री पकडण्यात आले होते. यावलच्या तरुणाने अमळनेरच्या युवकास यापूर्वी दोन पिस्टल विकल्याने या गुन्ह्यात अमळनेरच्या संशयीतीला अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता तिघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

काय घडले तरुणासोबत ?
यावल शहरातील बोरावल गेट जवळील रहिवासी युवराज उर्फ युवा राजू भास्कर (34) हा वराडसीम, ता.भुसावळ येथील भूषण कैलास सपकाळे (31) याला गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करीत असताना पोलिसांनी बुधवारी रात्री दोघांना पकडले होते. ही कारवाई अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर शहराच्या बाहेर दहिगाव फाट्याजवळ करण्यात आली.
या दोघांना रविवारपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचेे आदेश न्यायालयाने दिले. पोलिस कोठडीत चौकशी करतांना युवराज उर्फ युवा भास्कर याने अनिल मोहन चंडाले (35, रा.गांधलीपुरा, अमळनेर) यालादेखील दोन गावठी बनावटीचे पिस्टल विक्री केल्याची माहिती चौकशीत मिळाल्यानंतर या तरुणास यावल पोलिसांनी अटक केली.
अटकेतील तिघांना रविवारी यावल प्रथमवर्ग न्यायालयात सह दिवाणी न्यायाधीश जी. आर. कालते यांच्या न्यायासनाने 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तिघांची रवानगी भुसावळ अतिरिक्त उप जिल्हा कारागृहात करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.