He killed his wife out of suspicion of her character ; later he came to the police station and confessed to the murder. सांगली (29 सप्टेंबर 2025) : पत्नीशी झालेल्या वादातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली व नंतर स्वतःच पोलिसांना खुनाची कबुली दिली. सांगतील खण भागातील शांतीनगर येथे खुनाची घटना घडली. काजल एडके (28) असे खून झालेल्या पत्नीचे तर प्रशांत एडके असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे खून प्रकरण ?
प्रशांत एडके हा मजुरीचे काम करतो. त्याचा काजलशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोन मुलींसह शहरातील शांतीनगर परिसरात ते राहत होते. काजल आणि प्रशांत यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. काजल हिच्या चारित्र्याचा प्रशांतला संशय होता. त्यावरून सतत वाद होत होते. दहा दिवसांपूर्वी काजल घरातून निघून गेली होती. त्यामुळे प्रशांतने 16 सप्टेंबर रोजी सांगली शहर पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला परत आणले होते.
घर सोडण्याची धमकी
काजल परत आल्यानंतर प्रशांतने तिची समजूत काढली होती. तरीही त्यांच्यात वाद सुरूच होता. काजलने घर सोडून जाणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून रविवारी सकाळी पुन्हा वाद झाला. सकाळी साडेअकराच्या सुमारास काजल घरातील सर्व कामे आवरून झोपली होती. यावेळी पती प्रशांत घरी आला. त्याने धारदार हत्याराने काजलच्या गळ्यावर चार ते पाच वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या काजलचा रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला.
पत्नीच्या खुनानंतर प्रशांत याने दोन्ही मुलींना काही अंतरावर राहात असलेल्या आईकडे सोपवले. त्यानंतर घराला बाहेरून कडी लावून तो सांगली शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने पत्नीचा खून करून आल्याचे पोलिसांना सांगताच धावपळ उडाली.