Child murder case in Yaval: One arrested again यावल (30 सप्टेंबर 2025) : यावल शहरातील बाबूजीपुरा भागातील रहिवासी एका पाच वर्षीय अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करीत त्याची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तरुणास मदत केल्या प्रकरणी तरूणाच्या काकाला सोमवारी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात आता संशयीतांची संख्या दोन झाली आहे. असलउल्ला गुलाम दस्तगीर न्हावी (35) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयाने 3 ऑक्टोंबर पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आली.

काय आहे नेमके प्रकरण ?
शहरातील बाबूजीपुरा भागात एक पाच वर्षीय बालक हा 5 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाला व 6 सप्टेंबर रोजी त्याचा मृतदेह शेजारील रहिवासी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला न्हावी (22) या तरुणाच्या घरात आढळला.
संशयीताने बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची गळा आवळून हत्या करून त्याला जाळून टाकले व मृतदेह पोत्यात लपवला होता. या घटनेची माहिती संशयीत आरोपीच्या वडीलांनी पोलिसांना देवून मुलास पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीला 17 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडीचे आदेश केले. या गुन्ह्यात संशयीतास त्याचे काका शेख असलउल्ला गुलाम दस्तगीर न्हावी (35) यांनी मदत केल्याचे तपासात उघड झाल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली.
संशयीत शेख असलउल्ला यांना भुसावळ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता 3 ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्य मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.