दुचाकी अपघातात अंजाळेतील प्रौढाचा मृत्यू

A biker from Anjale village was killed on the spot after being hit by a buffalo यावल (30 सप्टेंबर 2025)  : यावल तालुक्यातील अंजाळे येथील मोर नदीच्या पुलावर रविवारी रात्री आठ वाजेदरम्यान म्हैशीने दुचाकीला धडक दिल्याने निवृत्ती शांताराम झाल्टे-कोळी (57) हे गंभीर जखमी झाले व त्यांना घरी नेले जात असताना त्यांचा मृत्यू ओढवला. या घटनेमुळे गाावत हळहळ व्यक्त करण्यात आली.

काय घडले प्रौढासोबत ?
अंजाळे, ता.यावल गावातील रहिवासी निवृत्ती शांताराम झाल्टे-कोळी (57) हे रविवार, 28 रोजी भुसावळ येथून घरी येत असतांना मोर नदीच्या पुलाजवळ म्हैशीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली यात ते दुचाकी वरून फेकले गेले. त्यांना डोक्याला व छातीला जबर दुखापत झाली. त्यांना अपघातानंतर घरी नेले असता घरी त्यांना रक्ताची उलटी झाली व त्यात त्यांचा जागीच त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले. त्यांचा मुलगा पुणे येथे कंपनीत असल्याने तो घरी सोमवारी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.