मुक्ताईनगरात तीन घरे फोडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लांबवला

Excitement in Muktainagar : Three houses broken into in one night मुक्ताईनगर (30 सप्टेंबर 2025) : मुक्ताईनगरच्या गोदावरी नगर परिसरात चोरट्यांनी घुमाकूळ घालत एकाच रात्रीत तीन घरे फोडत सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल लांबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. एका घरात चोरीचा प्रयत्न अपयशी ठरला.

एकाचवेळी तीन ठिकाणी घरफोड्या
गोदावरी नगरातील शुभम पुरुषोत्तम कलंत्री यांच्या घरात 28 रोजी सकाळी लाकडी कपाट उघडे आढळले. तपासात टेबलच्या ड्रॉकरमधून 32 हजार रुपये चोरीस गेल्याचे समोर आले.

यानंतर चोरट्यांनी खिडकीचे गज कापून मनोहर अशोक कुलकर्णी यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी 9500 रुपये रोख व महिलेच्या पर्समधील सात हजार मिळून 16 हजार 500 रुपयांची रोकड लांबवली.

आदर्श इंग्लिश मेडियम स्कूलजवळील परेश मधुकर चौधरी यांच्या बंद घरातून सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून दोन लाख 88 हजार रुपयांचा ऐकज लंपास करण्यात आला. चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, अंगठ्या, चांदीचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे.

या सर्व घटनांचा तपास पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र सुरवाडे करत आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी तपासणी करून ठसे घेतले. पोलिसांनी परिसरातील नागरिकांना कुठेही संशयित व्यक्ती आढळल्यास माहिती देण्यासे बाहेरगावी जाताना शेजारील लोकांना सांगून जाण्याचे आवाहन केले आहे.