माजी महापौर ललित कोल्हेकडे हवालासह क्रिप्टोने रक्कम येत असल्याचा संशय : आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी

Jalgaon bogus call center case : Suspects including Lalit Kolhe remanded in five-day police custody जळगाव (30 सप्टेंबर 2025) : जळगाव तालुक्यातील मुमराबाद शिवारातील माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या एल.के. फॉर्ममध्ये पोलिसांनी छापेमारी करीत बोगस कॉल सेंटर उघडकीस आणले होते. याप्रकरणी माजी महापौर ललित कोल्हेंसह संशयीतांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
जळगाव तालुक्यातील ममुराबाद शिवारातील एल.के.फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती जळगाव पोलिसांना मिळाली होती. या कॉल सेंटरच्या माध्यमातून यु.एस.आणि कॅनडा येथील नागरिकांना फोन करून अ‍ॅमेझॉन कस्टमर केअर असल्याचे सांगून अनेकांची लाखो रुपयांमध्ये फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 31 लॅपटॉप, सात मोबाईल, इंटरनेटसाठी लागणारे राऊटर जप्त करण्यात आले व ललित कोल्हेंसह आठ जणांना अटक करण्यात आली. संशयीतांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

राजकीय हेतूने गुंतवल्याचा आरोप
संशयीताना सोमवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता तपासाधिकारी नितीन गणापुरे यांनी संशयीताना लावलेल्या कलमांची व गुन्ह्याची माहिती न्यायालयाला दिली तसेच पोलिस कोठडी मिळण्यासाठी 21 कारणे न्यायालयाला दिली. संशयीतांतार्फे अ‍ॅड.अकील ईस्माईल, अ‍ॅड.सागर चित्रे, अ‍ॅड.महेश शिंपी आदींनी बाजू मांडली. राजकीय हेतूने ललित कोल्हे यांना गुंतवण्यात आल्याचे व बीएनएस कलम 111 लागू शकत नसल्याचा युक्तीवाद करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.