जळगाव (29 सप्टेंबर 2025) : जळगाव शहरातील निवृत्ती नगरात राहणार्या महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करत पतीला बँकेचे पैसे लवकर भरण्यास सांग नाहीतर पाहून घेईल, अशी धमकी देण्यात आली. ही घटना रविवार, 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. याबाबत रात्री नऊ वाजता जिल्हापेठ पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे नेमके प्रकरण ?
कविता विकास पाटील (35) या महिला आपले पती विकास पाटील यांच्या सोबत निवृत्ती नगरात वास्तव्याला आहेत. विकास पाटील यांनी बँकेचे कर्ज काढले आहे. या कर्जासाठी सुनिल देशमुख (श्रीरामनगर, जळगाव) हे जामीनदार आहेत. रविवार, 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता कविता पाटील या महिला घरी एकट्या होत्या त्यावेळी सुनील देशमुख हा महिलेच्या घरात अनधिकृतपणे घुसून तुझ्या पतीला लवकर बँकेचे कर्ज भरण्यास सांग नाहीतर त्याला पाहून घेईल अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जिल्हापेठ पोलिसात याबाबत तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री 9 वाजता जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला कॉन्स्टेबल भारती देशमुख करीत आहेत.