पाच लाखांसाठी जळगावातील विवाहितेचा छळ

जळगाव (29 सप्टेंबर 2025) : हुंड्याचे पाच लाख रुपये आणावे व लग्न जमविणार्‍यांनी खोटे बोलून फसवणूक केल्याचा प्रकार आला असून या प्रकरणी जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील माहेर असलेल्या विवाहितेच्या तक्रारीवरून रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले विवाहितेसोबत ?
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील माहेर असलेल्या निकिता स्वप्नील पाटील (23) यांचा विवाह रावेर तालुक्यातील मोरगाव येथील स्वप्नील विनोद पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला आहे. लग्नानंतर काही दिवसातच पती स्वप्निल पाटील हा दारू पिऊन घरात भांडण करायला सुरूवात केली. त्यानंतर माहेराहून पाच लाख रुपये आणावे, अशी मागणी केली.

दरम्यान स्वप्निलचे या आधी दोन लग्न होवून घटस्फोट झाल्याचे विवाहितेला समजल्यानंतर त्यांनी लग्न जमविणार्‍यांना जाब विचारला असता त्यांनी महिलेला शिवीगाळ करत आम्हाला फोन आणि संपर्क करू नये, अशी धमकी दिली. दरम्यान विवाहितेने याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पती स्वप्नील विनोद पाटील (मोरगाव, ता.रावेर), पतीची आजी सुनंदाबाई बाबुराव जाधव, मावसा आजा बाबुराव सीताराम जाधव, मावस मामा युवराज बाबुराव जाधव, मावस मामी रूपाली युवराज जाधव (सर्व राहणार खानापूर ता. रावेर), मावशी सुनीता किसन पाटील (कुसुंबा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मुकुंद पाटील करीत आहे.