Gold and silver rise again : New high in price growth जळगाव (30 सप्टेंबर 2025) : सोने-चांदी खरेदी जणू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असून आठवड्याच्या दुसर्या दिवशी देखील सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे दोन्ही धातूंच्या दराने आता नवा उच्चांक गाठला आहे. ऐन दसर्याच्या तोंडावर ही वाढ झाली आहे.

असा आहे सोन्याचा नवीन दर ?
मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी 24 सह 18 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 1,420 रूपयांची वाढ होऊन ते एक लाख 18 हजार 310 रुपयांवर पोहोचले. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात एक हजार 300 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट एक तोळे सोनं खरेदीसाठी आपल्याला एक लाख आठ हजार 450 रुपये मोजावे लागणार आहेत. 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात एक हजार 60 रुपयांची वाढ झाली आहे. 18 कॅरेट एक तोळं सोनं खरेदीसाठी 88 हजार 730 रुपये लागतील.
चांदीचा दर वाढला
सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड सुरुच असल्याचे चित्र आहे. आज प्रति किलो चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला एक लाख 51 हजार रुपये लागणार आहेत.
कधी रशिया युक्रेन युद्ध, तर कधी डोनाल्ड ट्रम्प यांचं टेरीफ धोरण, तर कधी अमेरिकन फेडरल बँकांनी घडविलेले व्याज दर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मागच्या काही महिन्यापासून सोने-चांदी दरात दिवसागणिक मोठी वाढ होताना दिसत आहे. आगामी दिवाळी आणि लग्नसराईपर्यंत सोन्या चांदीचा दर कुठवर जाणार ? याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.