अकोला हादरले : सावत्र बापाचा लेकीवर अत्याचार

A homicidal father raped a minor girl as soon as her mother went out to watch Garba अकोला (30 सप्टेंबर 2025) : नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा दांडिया पाहण्यासाठी आई बाहेर पडताच नराधम सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही घटना अकोल्यातील खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडीतेची आई घरी आल्यानंतर तिने घडला प्रकार सांगताच पोलिसात धाव घेण्यात आली. नराधम पित्याला अटक करण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण ?
शहरातील खदान पोलिस स्टेशन हद्दीत पीडीता वास्तव्यास आहे. पाच वर्षीय चिमुकलीची आई गरबा पाहण्यासाठी बाहेर पडताच सावत्र पित्याने चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या भीषण प्रकारामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. दरम्यान, खदान पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी सावत्र बापाला अटक करत त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवले आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेची आई गरबा खेळण्यासाठी बाहेर गेली होती. घरात मुलगी आणि सावत्र बाप दोघेच असताना आरोपीने संधी साधून मुलीवर अमानुष अत्याचार केला. घटनेनंतर मुलीला तीव्र पोटदुखी जाणवू लागली. आई घरी परतल्यावर निरागस चिमुकलीने धैर्य दाखवत घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर तातडीने मुलीला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.