जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोनसाखळी लंपास

Woman’s gold chain stolen from bus stand in Jalgaon जळगाव (30 सप्टेंबर 2025) : गावासाठी निघालेल्या जामनेरच्या 59 वर्षीय महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने हिसकावून पळ काढला.

ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. चोरट्याने सुमारे 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी लांबवली. या संदर्भात 28 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जामनेर येथील कल्पना सुनील लखोटे (59, रा.माळी गल्ली, जामनेर) या आपल्या कामासाठी जळगाव शहरात आल्या त्यानंतर खाजगी काम संपल्यानंतर त्या 24 सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता जामनेरला जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर आल्या. त्याच वेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची सोनसाखळी तोडून पळ काढला.