भुसावळ (30 सप्टेंबर 2025) : कौटूंबिक कारणास्तव आलेल्या नैराश्यातून अलीकडे भुसावळातील तापी नदीवरून उडी घेवून आत्महत्या करण्याचे प्रमाण व प्रकार वाढल्याने तापी नदीला संरक्षक जाळ्यात बसवणे काळाची गरज आहे. या संदर्भातील निवेदन मुक्ताईनगर भाजपा सचिव गणेश काळे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना देण्यात आले.

तर थांबतील आत्महत्या !
निवेदनाचा आशय असा की, भुसावळसह व यावलला जोडणार्या शहरातील तापी नदीवरून अलीकडील काळात अनेकांनी उड्या घेवून आपल्या जीवनयात्रा संपवल्या आहेत. या प्रकारामुळे कुटूंबावर मोठा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. सातत्याने घडणारे हे प्रकार थांबण्यासाठी तापी नदीला संरक्षक जाळ्या बसवल्यास आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल, असा आशावाद निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे. निवेदन देताना सुशील बोदडे, इम्रान खान, भूषण बोदडे, रेहान खान आदी उपस्थित होते.