भुसावळ (30 सप्टेंबर 2025) : कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय ‘रसायनशास्त्रातील बदलते परिमाणे’ (सीपीसीएस 2025) या विषयावर सलग पाचवी द्विवार्षिक राष्ट्रीय परिषद सोमवार, 29 सप्टेंबर 2025 रोजी झाली. या परिषदेसाठी असोसोसिएशन ऑफ केमिस्ट्री टिचर्ससह आयोजक होते.

यांची होती उपस्थिती
उद्घाटन संस्थाध्यक्ष डॉ.मोहन फालक यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, डॉ.विनोद चौधरी, (सी.एस.आय.आर. – आय.एम.टेक. चंदिगढ), डॉ.संजोग नगरकर (आय.आय.टी . मुंबई), डॉ.सौरभ श्रीवास्तवा (मणिपाल विद्यापीठ जयपूर), नाहाटा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, प्रा.जी.एच.सोनवणे, उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी, डॉ.डी.एन.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एस.डी. येवले, समन्वयक डॉ.सी.एच.सरोदे, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ.कोलते व डॉ.क्षिरसागर उपस्थित होते.
वक्त्यांनी केले मार्गदर्शन
पहिल्या सत्रात माननीय डॉ.विनोद चौधरी, यांनी सध्या मल्टि ड्रग रेसिस्टन्ट इन्फेक्शन्सशी सामना करू शकतील अश्या अँटिबायोटिक उपलब्ध नसल्याचे सांगितले. डॉ.संजोग नगरकर यांनी मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क वरील अद्ययावत संशोधनाची माहिती दिली. त्यांनी त्यांच्या रिसर्च ग्रुप मध्ये सुरु असलेल्या डीझाईनिंग ग्लासी अॅण्ड लिक्विड स्टेट्स ऑफ मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क या विषयावर माहिती दिली
दुसर्या सत्रात डॉ.सौरभ श्रीवास्तवा यांनी थेरॉटिकल केमिस्ट्रीचा वापर करून विविध संयुगांच्या मोलेक्युल लेव्हलला जाऊन त्यांच्या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चा अभ्यास कसा करता येतो याबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी मॉलिक्युल गिअर्स मधील रोटेशनल एनर्जी ट्रान्सफर आणि अश्या प्रकारचे मॉलिक्युल डिझाईन करताना काय अडचणी येतात याबद्दल माहिती दिली.
या परिषदेमध्ये एकूण 260 पेक्षा जास्त विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक सहभागी झाले होते. तसेच 60 पेक्षा जास्त संशोधकांनी पोस्टरद्वारे त्यांचे संशोधनाचे सादरीकरण केले.
परिषदेच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एच.बर्हाटे अध्यक्षस्थानी होते. आपल्या समारोपपर भाषणात डॉ. बर्हाटे यांनी विज्ञान विषयातील वैशिष्ट्यपूर्ण कामाची नवीन पिढीतील संशोधकांमध्ये जाणीव वृद्धिंगत व्हावी यासाठी अशा परिषदांचे आयोजन महत्वाचे ठरते, असे सांगितले.
सूत्रसंचालन समन्वयक डॉ.सी.एच.सरोदे यांनी केले. या परिषदेसाठी रसायनशास्त्र विभागप्रमुख परिषदेचे चेअरमन डॉ.एस.डी.येवले, परिषदेचे सचिव डॉ.सचिन कोलते व डॉ.अजय क्षिरसागर, परिषदेच्या कोषाध्याक्षा डॉ.संगीता भिरूड, डॉ.विलास महिरे, डॉ.उमेश फेगडे, डॉ.नीलिमा पाटील, प्रा.तेजश्री झोपे, प्रा.धनश्री बरडे, प्रा.सागर सोनवणे, प्रा. प्रशांत पाटील तसेच रसायनशास्त्र विभागातील शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.