भुसावळ (30 सप्टेंबर 2025) : प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने दुर्गा पूजा, दसरा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या पार्श्वभुमीवर तब्बल 60 अतिरिक्त विशेष गाड्यांच्या फेर्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे महाराष्ट्रातून बिहार, झारखंड, तेलंगणा तसेच उत्तर भारतातील विविध भागात जाणार्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.या गाड्या भुसावळ जंक्शनवर थांबणार आहे.

अशा आहे रेल्वे गाड्या
रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात येत असलेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी-आसनसोल-सीएसएमटी साप्ताहिक विशेष गाडीच्या 12 फेर्या होणार आहे. 6 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक सोमवार व बुधवार या मार्गावर वातानुकूलित गाड्या धावतील. तसेच सीएसएमटी (मुंबई)-करीमनगर-सीएसएमटी साप्ताहिक विशेष गाडीच्या 12 फेर्या होतील, ही गाडी 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक शनिवारी ही गाडी चालवली जाणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-मुजफ्फरपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडीच्या सुध्दा 12 फेर्या होणार आहे, ही गाडी 7 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवार व गुरुवारी ही गाडी धावेल. तसेच पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडीच्या 24 फेर्या होणार आहे. ही गाडी 6 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान आठवड्यातून दोनदा या मार्गावर गाडी धावेल.
या सर्व गाड्यांमध्ये वातानुकूलित डब्यांचा समावेश असून, प्रवाशांना आरक्षणाची सुविधा सर्व संगणकीकृत केंद्रांवर तसेच रेल्वे स्थानकावर उपलब्ध आहे.अनारक्षित डब्यांची तिकिटे पद्वारे बुक करता येतील. विशेष गाड्यांमुळे उत्सव काळात होणारी गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना प्रवास सोयीचा होईल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.