चोरीच्या चार दुचाकींसह चोरटा भडगाव पोलिसांच्या जाळ्यात

Bhadgaon Police’s performance : Four stolen two-wheelers seized from a thief in Shirpur भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव पोलिसांनी शिरपूर तालुक्यातील दुचाकी चोरट्याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरीच्या तब्बल चार दुचाकी जप्त केल्या आहेत. इंद्रसिंग भीमा पावरा (रा.बोरमळी, ता.शिरपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

दुचाकी चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
भडगावातील नाना नामदेव धनगर (63) यांच्या घरासमोरुन होंडा शाईन (एम.एच 19 डी.डी.3729) 26 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता चोरीला गेली होती. भडगाव पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे इंद्रसिंग भीमा पावरा (रा.बोरमळी, ता.शिरपूर) याला अटक केली व तपासात त्याने भडगावातून चोरलेल्या दुचाकीसह अन्य तीन दुचाकी काढून दिल्या. तीन दुचाकींचे मालक निष्पन्न झाले आहे

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश शर्मा, एएसआय भरत लिंगायत, हवालदार निलेश ब्राम्हणकार, हवालदार विजय जाधव, कॉन्स्टेबल सुनील राजपुत, कॉन्स्टेबल संदीप सोनवणे, चालक कॉन्स्टेबल संजय पाटील आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार विजय जाधव करीत आहेत.