Police combing in Bhusawal : Attal Irani accused caught भुसावळ (30 सप्टेंबर 2025) : पोलिसांच्या अभिलेखावरील अट्टल आरोपींना भुसावळात पोलिसांनी कोम्बिंगद्वारे बेड्या ठोकल्या आहेत. तालीब अली रशीद अली (20, रझा टॉवर, पापा नगर, भुसावळ) व मोहम्मद अली लियाकत अली (35, रझा टॉवर, पापा नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

कुख्यात आरोपींना कोम्बिंगमध्ये बेड्या
आरोपी तालीब अली विरोधात एमआयडीसी व वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात तो वॉण्टेड आहे तर मोहम्मद अली विरोधात उपनगर पोलिसात दोन, जिल्हापेठ, बाजारपेठ, उमरेड, जि.नागपूर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
यांनी केली कारवाई
भुसावळातील रजा टॉवर, ईराणी मोहल्ला भागात पोलिसांनी मंगळवार, 30 रोजी सप्टेंबर रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ, एपीआय नितीन पाटील, फौजदार सोपान गोरे, फौजदार राजू सांगळे, फौजदार भारती काळे, श्रेणी फौजदार रवी नरवाडे आदींच्या पथकाने केली.