विद्यार्थ्यांना मशिदीत नेले भोवले : भुसावळातील सेंट अलॉयसीसच्या मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षकांचे निलंबन

दोघा शिक्षण सेविकेबाबत शाळा स्तरावर निर्णय घेण्याचे आदेश : कारवाईचा अहवाल सात दिवसात मागितला

Students visit mosque in Bhusawal under the guise of a trip: Order of suspension of five teachers including the principal of St. Aloysius भुसावळ (30 सप्टेंबर 2025) : धार्मिक स्थळांना भेट देण्याच्या नावाखाली विद्यार्थिनींना मशिदीत नेण्यात आले होते. यावेळी ‘इस्लाम : आतंक नव्हे आदर्श’ पुस्तकाचे वाटप करण्यात आल्यानंतर भुसावळातील हिंदू संघटना प्रचंड संतप्त झाल्या होत्या. शाळा प्रशासन हिंदू विरोधी कृत्य करीत असल्याचा आरोप करीत दोन समाजात तेढ निर्माण करणारा हा प्रकार असल्याने दोषींवर कठोर कारवाई करण्यासह शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. शासनाने या मागणीची दखल घेत त्रिसदस्यीय समिती नेमल्यानंतर समितीच्या अहवालानंतर शाळेतील मुख्याध्यापिका व अन्य चार शिक्षकांचे निलंबन तसेच दोघा शिक्षण सेविकेबाबत शाळा स्तरावरून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिल्यानंतर शाळेतील शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शाळेतर्फे आयोजित ही सहल धर्मनिरपेक्षता तत्वावर आधारीत नसल्याचे तसेच विद्यार्थी स्काऊट-गाईडच्या गणवेशात नसल्याने शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक व शिक्षकांवर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला.

हिंदूत्ववादी संघटना आक्रमक : तक्रारीची दखल
भुसावळातील समाजसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य प्रमोद वामन सावकारे यांनीदेखील या संदर्भात लेखी तक्रार केली होती तर भुसावळचे समकित सुराणा यांनी कायदेशीर नोटीस बजावली तसेच शहरातील विविध हिंदूतत्वादी संघटनांनी केलेल्या तक्रार व पाठपुराव्या अंती शासनाने कारवाई दखल घेतली आहे.

सहलीच्या नावाखाली विद्यार्थिनींना नेले मशिदीत
भुसावळातील सेंट अलॉयसियस हायस्कूलच्या इयत्ता नववीच्या स्काऊट व गाईड युनिटच्या विद्यार्थ्यांना धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी सहल काढण्यात आली. त्यासाठी शंभर रुपये गोळा करण्यात आले मात्र अन्य धार्मिक स्थळांना अल्प वेळ भेट दिल्यानंतर मशिदीत मात्र विद्यार्थिनींनाही प्रवेश देण्यात आला तसेच ‘इस्लाम : आतंक नव्हे आदर्श’ पुस्तकाचे वाटप करण्यात आले. हा प्रकार शहरातील हिंदूतत्वादी संघटनांपर्यंत आल्यानंतर त्यांनी शहरात मोठा मोर्चा काढत दोषींवर गुन्हा दाखल करण्यासह शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली. या प्रकारानंतर त्रीसदस्यी समितीने चौकशी करीत अहवाल दिला.

यांच्या निलंबनाचे आदेश
जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी सेंट अलॉयसीस शाळेच्या मुख्याध्यापिका शिला सायमन यांच्यासह शिक्षक अमोल वसंत दांदळे, शेख इरफान मुस्ताक शेख, बनॉर्ड एस.मॉरिस आणि मिशेल फर्नांडिस या शिक्षकांचे निलंबन करून महाराष्ट्र खाजगी शाळा सेवा शर्ती नियमावली 1981 नुसार पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सात दिवसांच्या आत मागितला कारवाईचा अहवाल
शिक्षण विभागाकडून अद्याप मान्यता नसलेल्या तसेच संस्थेने नियुक्त केलेल्या दोन शिक्षण सेविका आफशीन ईजलाल खान आणि कॉलीन कौर हरप्रीतसिंग नेब यांचे निलंबन करावे अथवा त्यांना सेवेतून काढून टाकावे याबाबतचा निर्णय संस्थेने घ्यावा, असे आदेशात नमूद आहे तर खाजगी संगणक शिक्षक गुरुजीतसिंग पदम यांच्या नियुक्तीबाबत अधिकृत पुरावे नसल्याने त्यांच्यावर कारवाईबाबत आपल्या स्तरावरून योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेशात बजावले आहे. संबंधितांवर काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल सात दिवसात जि.प.माध्यमिक शिक्षण विभागाला सादर करावा, असेही आदेशात बजावण्यात आले आहे. या कारवाईने शिक्षकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत लढा देणार : समकित सुराणा
10 सप्टेंबर 2025 रोजी बेकायदेशीररित्या विद्यार्थ्यांना मशिदीत नेवून मौलानांचे प्रवचन ऐकवणे, ‘इस्लाम आतंक नव्हे आदर्श’ पुस्तक देण्याचा प्रकार घडला. हिंदू मंदिरातील ऐच्छिक भेट केवळ 15 मिनिटांची बिन पूजारी ठेवण्यात आली. या विषयाचा पाठलाग अखेरपर्यंत करून दोषींना जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही तो पर्यंत आपला लढा असेल, असे समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे समकित नितीन सुराणा म्हणाले.