Young man dies in well after losing balance while drawing water: Holapappimpreet mourns पारोळा (1 ऑक्टोबर 2025) : पारोळा तालुक्यातील होळपिंप्री येथील 28 वर्षीय तरुणाचा विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून मृत्यू झाला. पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कल्पेश गोरख पाटील असे मयत शेतकर्याचे नाव आहे.

काय घडले शेतकर्यासोबत ?
होळपिंप्री येथील तरुण शेतकरी कल्पेश गोरख पाटील हे विहिरीजवळ पाणी काढण्यासाठी गेल्यानंतर त्यांचा पाय घसरला व ते विहिरीत पडले. त्यांचे वडील गोरख पाटील यांनी बराच वेळ होऊन गेला तरी मुलगा परत आला नाही,. हे बघण्यासाठी विहिरीजवळ गेले असता ही घटना उघडकीस आली मात्र संध्याकाळ झाल्यामुळे गावातील ग्रामस्थांना बोलवून रात्री मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या अंधारामुळे मृतदेह सापडू शकला नाही.
रविवारी सकाळी पोहोण्यासाठी तरबेज असलेल्या व्यक्तींना बोलावून कल्पेश पाटील यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अजित पाटील यांनी पारोळा पोलिसांत खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.