रावेर लोकसभा क्षेत्रात पालिका निवडणुका ताकदीने लढणार ! : आमदार अनिल पाटील

Local body elections : Nationalist party will contest strongly in Raver Lok Sabha constituency ; MLA Anil Patil भुसावळ (1 ऑक्टोबर 2025)  : रावेर लोकसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी निवडणुका ताकदीने लढणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन भुसावळातील बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खान्देश प्रभारी तथा आमदार अनिल पाटील यांनी केले.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी पक्षाची रावेर लोकसभा क्षेत्राची जिल्हा बैठक सोमवारी शहरातील स्टार लॉनमध्ये झाली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, हारूनसेठ, भगतसिंग पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूक नियोजनावर चर्चा झाली. तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनी संघटनेचा आढावा सादर केला. काही पदाधिकार्‍यांना नियुक्तपत्र देण्यात आले.

पक्षाला चांगले यश मिळेल : देवकरांना विश्वास
रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे संघटन आहे. यामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळेल, असे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले. नव्याने पक्षात आलेल्या लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी पक्ष वाढीसाठी स्वतः पुढाकाराने प्रत्येक तालुक्यात जाऊन संघटन अजून मजबूत करण्याचा विश्वास दिला.