पाच पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मनाई : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Prohibitory order in force in Jalgaon district till October 16 जळगाव (1 ऑक्टोबर 2025) :जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 2 ऑक्टोंबर,2025 चे रात्री 12.01 वाजेपासून ते 16 ऑक्टोंबर, 2025 रात्री 12 वाजे पर्यंत, मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1)व (3) नूसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.

वरील कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न समारंभ व प्रेत यात्रा तसेच धार्मिक मिरवणूका यांना लागू राहणार नाही, असे अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.