नाशिकचे डॉ.योगेश्वर नावंदर यांची हायवे स्पेसिफिकेशन अ‍ॅण्ड स्टँडर्ड्स कमिटीवर नियमित सदस्यपदी निवड

नाशिक रोड (2 ऑक्टोबर 2025) : शहरातील रहिवासी डॉ. योगेश्वर नावंदर यांची हायवे स्पेसिफिकेशन अ‍ॅण्ड स्टँडर्ड्स कमिटीवर नियमित सदस्य म्हणून निवड झाली आहे. ही निवड अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.

एचएसएस ही इंडियन रोड्स काँग्रेस (आयआरसी) अंतर्गत कार्यरत सर्वोच्च समिती आहे. रस्ते, वाहतूक, वाहतूक व्यवस्थापन आणि देखभाल यासंबंधीच्या सर्व महत्त्वपूर्ण बाबींसाठी समितीवर जबाबदारी आहे.

या समितीमार्फत नियोजन, डिझाइन, बांधकाम, वाहतूक व्यवस्थापन आणि देखभाल यांसह रस्त्यांशी संबंधित राष्ट्रीय धोरणे व मानके ठरविली जातात. तसेच एचएसएस समिती आयआरसीमधील दहा तांत्रिक समित्यांचे (एच- 1 ते एच- 10) मार्गदर्शन करते. या समित्या वाहतूक नियोजन, लवचिक-कठोर व संमिश्र फुटपाथ डिझार्ईन, तटबंदी व ड्रेनेज, ग्रामीण रस्ते, रस्ते सुरक्षा, शहरी रस्ते आणि डोंगराळ रस्ते यांसारख्या विविध क्षेत्रांत तांत्रिक तज्ज्ञ मार्गदर्शन पुरवतात.

डॉ. योगेश्वर नावंदर यांच्या या निवडीमुळे नाशिकचा गौरव वाढला असून या क्षेत्रात त्यांचे योगदान नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.