जळगावातील दीक्षीतवाडीत चोरी : सात तोळ्यांची सोनपोत लंपास

Theft in Dikshitwadi, Jalgaon: Gold vessel worth seven tolas stolen जळगाव (3 ऑक्टोबर 2025) : चोरट्यांनी महिलेच्या घरात प्रवेश करीत सात तोळे वजनाची पोत लांबवल्याचा प्रकार शहरातील दीक्षीतवाडीत घडला. ही घटना 27 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले महिलसोबत ?
प्रणाली किरण बारी (29, रा.दीक्षितवाडी) या 25 सप्टेंबरला रात्री देवीच्या आरतीसाठी जाताना सोन्याची पोत घालून गेल्या. तेथून परतल्यानंतर त्यांनी ती मंगलपोत कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवली. 27 सप्टेंबर रोजी कपाटाचे लाकडी ड्रॉवर खाली पडले. यावेळी त्यांना ड्रॉवरमध्ये ठेवलेली मंगलपोत दिसली नाही.

शोध घेऊनही मंगलपोत न सापडल्याने महिलेने जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी 30 सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.